संत गजानन महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपुरात …
सोलापूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी आज पंढरपूर मध्ये दाखल झालीय. तब्बल साडेसातशे किलोमीटर प्रवास करून आज विठूरामाचा गजर करत ही पालखी पंढरपूर मध्ये आलीय. 26 मे रोजी पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं होतं. ३२ दिवसांचा प्रवास करून हा सोहळा आज पंढरपुरात विसावला. आता संत गजानन महाराज यांच्या पादुकांचा पौर्णिमा पर्यंत पंढरपूर येथे मुक्काम असणार आहे. अत्यंत शिस्तप्रिय पालखी सोहळा म्हणून गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याकडे पहावे लागेल.
ML/KA/PGB 27 Jun 2023