संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचेही प्रस्थान….

 संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचेही प्रस्थान….

छ. संभाजी नगर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील पैठण येथील श्रीनाथांच्या पालखीने प्रस्थान ठेवले असून एकनाथ-भानुदासच्या जयघोषाने पैठण शहर दुमदुमले आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण येथील शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे सूर्यास्तासमयी पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

यावेळी भानुदास – एकनाथांचा जयघोषात करत पैठणनगरी दुमदुमली यावेळी भाविकांनी दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी केली होती.
“माझे जिवाची आवडी, पंढरपुरा नेईल गुढी’ या अभंगाप्रमाणे मराठवाड्याच्या कानाकोप-यातून या पालखीत सहभागी होण्यासाठी हजारो वारकरी सकाळपासूनच पैठणनगरीत दाखल झाले होते. दिवसभर पैठण शहरात टाळ-मृदंगाच्या गजरात एकनाथ-भानुदास नामाचा गजर सुरू होता. त्यामुळे संपूर्ण शहर भक्तीमय झाल्याचे पाहावयास मिळत होते.

ML/KA/PGB 11 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *