या राज्यात मदरशांमध्ये शिकवले जाणार संस्कृत आणि वेदाभ्यास

 या राज्यात मदरशांमध्ये शिकवले जाणार संस्कृत आणि वेदाभ्यास

डेहराडून, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुस्लिम विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरशांमध्ये आता हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या वेद आणि संस्कृत भाषाही शिकवण्यात येणार आहे, उत्तराखंडच्या मदरसा बोर्डानं हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. उत्तराखंड मदरशा बोर्डाचे अध्यक्ष मुफ्ती शमून कासमी यांनी मदरशांमध्ये वेद आणि संस्कृत शिकवलं जाणार असल्याची घोषणा केली. इथल्या साबिर दर्ग्याला त्यांनी भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, “साबिर पाक यांचा दर्गा हा केवळ मुस्लिम समुदयांसाठीच नाही तर प्रत्येक धर्माला मानणाऱ्या लोकांसाठी आस्थेचं प्रतिक आहे”. मात्र या घोषणेवरुन आता वाद निर्माण झाला आहे. जमीयत उलेमा हिंद या मुस्लिम संघटनेनं या निर्णयाला विरोध केला आहे.

मुफ्ती शमून कासमी म्हणाले की, “उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अल्पसंख्यांकं वर्गासाठी विविध योजना तयार करुन त्यांना विकासाच्या मार्गावर नेत आहेत. तसेच उत्तराखंडमध्ये गाय, गंगा आणि हिमालयाच्या संरक्षणासाठी मुस्लिम समाज अभियान चालवेल तसेच मदरशांमध्ये धार्मिक शिक्षणासह योग, वेद आणि भारतीय महापुरुषांचं आत्मचरित्र देखील शिकवलं जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

जमीयत उलेमा हिंद या संघटनेचे अध्यक्ष मौलाना मोहम्मद आरिफ कासमी म्हणाले, “उत्तराखंड मदरशा बोर्डाच्या अध्यक्षांनी लंढौरा इथं जे विधान केलं. त्यानुसार, वेद आणि संस्कृत मदरशांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल, याचा कडाडून विरोध करायला हवा. जमीयत कोणत्याही भाषा किंवा धर्माविरोधात नाही. पण अरबी मदरशांमध्ये संस्कृत आणि वेदांचं शिक्षण कुठल्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नाही”.

दरम्यान दरशांमध्ये वेद शिकवणार मग हिंदु गुरुकुलांमध्ये कुराण आणि अरबी शिकवणार का, असा सवालही पुरोगामी कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

SL/KA/SL

28 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *