वृक्ष वाचविण्यासाठी केला संक्रांतीच्या सुगडाचा वापर

 वृक्ष वाचविण्यासाठी केला संक्रांतीच्या सुगडाचा वापर

वाशीम, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मकर संक्रांतीला सुवासिनींना सुगड्यांमध्ये वाण देऊन हा सण साजरा केला जातो पूर्वी ह्या सुगड्यांचा वापर पुढे उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी केला जायचा मात्र आजच्या आधुनिक काळात घरोघरी फ्रीज, रेफ्रिजरेटरचा वापर वाढल्यामुळे ह्या सुगड्या दुर्लक्षित झाल्या आहेत मात्र याच सुगड्यांचा वापर एस एम सी इंग्लिश स्कूलचे राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी वृक्ष वाचविण्यासाठी करीत आहेत. त्यामुळं या अभिनव उपक्रमाच सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

मातीच्या या सुगड्यात पाणी भरून झाडाच्या बुडाखाली ठेवुन झाडांच्या बुडात ओलावा कायम राखला जातो. दरम्यान, शाळेच्या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. Sankranti Sugada was used to save the tree

ML/KA/PGB
25 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *