संजोग वाघेरे पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

 संजोग वाघेरे पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

पुणे, दि. २३ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमदेवार संजोग वाघेरे पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. वाघेरे पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. पिंपरी येथून भव्य अशी मिरवणूक रॅली आणि सभेनंतर मावळचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय वाघिरे पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला..

अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा आमदार जयंत पाटील, शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन अहिर आदी प्रमुख नेत्यांसह महाविकास आघाडीतील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शेतकरी कामगार पक्ष, तसेच इतर सर्व पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी‌ व‌ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ML/ML/SL

23 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *