माऊलींच्या जन्मस्थळी संजीवन समाधी सोहळा सुरू
छ संभाजी नगर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माऊलींच्या विष्णुरुप मुखकमलावर पहिल्या दिवशी सूर्यदर्शन होऊन माऊलींचा संजीवन समाधी सोहळा सुरू झाला आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आपेगावात यानिमीटने भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी असलेल्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र आपेगाव येथे माऊलीचा संजीवन समाधी सोहळा सुरू आहे. या सोहळ्या प्रसंगी माऊलीच्या मुर्तीवर किरणोत्सव बघायला मिळाल्यावर वारकरी तथा भाविकांनी माऊलींचा गजर केला. Sanjivan Samadhi ceremony starts at Mauli’s birth place
तीन दिवस हा किरणोत्सव पाहिला मिळणार आहे.
यावर्षी माऊली श्रीविष्णुच्या रुपात गरुडावर विराजमान, हातात शंख, चक्र अशा स्वरूपाची पूजा बांधण्यात आली असून भाविकांना दर्शन होत आहे.
ML/KA/PGB
10 Dec 2023