मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी शैक्षणिक व आर्थिक विकासाची गरज – खा. संजय दिना पाटील

मुंबई, दि. ६ – ‘भारतीय मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी पुढील २५ वर्षांचा रोडमॅप’ तयार करण्यासाठी Association of Muslim Professionals (AMP) आणि Indian Islamic Cultural Centre (IICC) यांच्या संयुक्त विद्यमाने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
दिल्ली येथे खासदारांसोबत राष्ट्रीय सल्लागार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी पुढील २५ वर्षांचा रोडमॅप या विषयावर सखोल विचार मंथन झाले. देशातील मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी धोरणात्मक चर्चा, सुचना आणि कृती आराखडे यावर मार्गदर्शन करण्यात आले. या महत्त्वपूर्ण बैठकीत संसद सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवाजीनगर, मानखुर्द या विधान सभा क्षेत्रात डंम्पिगमुळे येथील नागरिकांचे आयुष्यमान कमी झाले असून त्यांच्यासाठी दर्जेदार आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. त्यांच्या राहणीमानात सुधारणा होणे अत्यावश्यक असून शिक्षण आणि आर्थिक विकासासाठी काम करणे महत्त्वाचे असल्याचे खासदार संजय दिना पाटील यांनी सांगितले. या बैठकीला परभणीच्या राज्यसभा खासदार फौजीय खान, उत्तर प्रदेश, कैराना येथील समाजवादी पक्षाच्या खासदार इकरा हसन व काँग्रेस नेते सलमान खुर्शिद उपस्थित होते.ML/ML/MS