शाश्वत शेती, पारंपरिक बीजसंवर्धन, आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषक कल्याणाचा जागर करणारा महोत्सव.

दिल्ली, दि ५
कृषी, तंत्रज्ञान, संस्कृती आणि ग्रामीण विकास यांचा संगम ठरणाऱ्या श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, दिंडोरी यांच्या वतीने आयोजित कृषी महोत्सव २०२६ चा ‘सिंहावलोकन सोहळा’ नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे संपन्न झाला. यावेळी ईशान्य मुंबईचे (UBT) खासदार संजय दीना पाटील हेही उपस्थित होते.
गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, नाशिक येथे २३ ते २७ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी देशभरातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

शाश्वत शेती, पारंपरिक बीजसंवर्धन, आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषक कल्याणाचा जागर करणारा हा महोत्सव ग्रामीण भारतासाठी नव्या संधींचे द्वार उघडणारा ठरेल. ML/ML/MS