कर्जत तालुका हुतात्म्यांची भूमी – खा. संजय दिना पाटील

मुंबई, दि. 3 ( प्रतिनिधी ) – कर्जत तालुक्यातील नेरळ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील सामाजिक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना लॅपटॉप व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कर्जत तालुका आगरी समाज संघटने तर्फे दहावी-बारावी मध्ये उज्वल कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप तसेच सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार संजय दिना पाटील यांनी सांगितले की, माझे वडील आगरी समाजाचे अध्यक्ष असताना त्यांनी या भागात अनेक सामाजिक कार्य केले असून त्यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. कर्जत तालुक्याला भाई कोतवाल, हिराजी पाटील यांच्यासह असंख्य क्रांतिकारकांच्या शौर्याची परंपरा आहे. त्या भूमीवर येताना आपल्याला अत्यंत आनंद झाला. कर्जत तालुका आगरी समाज संघटना आजही आपली संस्कृती जपण्याचे कार्य करीत असून कर्जत तालुक्यातील ८४ गावे आगरी समाजाचे विचार आणि आचरण एक संघ राहावे म्हणून सतत सामाजिक कार्य हाती घेत असल्याचे खासदार संजय दिना पाटील यांनी शेवटी सांगितले.

यावेळी शिवक्रांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अविनाश भोईर, आगरी समाज नेते जयेंद्र खुणे तसेच संपर्कप्रमुख दिनेश कालेकर या कार्यक्रमाला उपस्थित होते. ML/ML/MS