सोलापुरच्या बहिणींना खा. संजय दिना पाटील यांची मदत
मुंबई, दि. २९– राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर अजूनही कायम आहे. रविवारी मराठवाड्यात पावसाने थैमान घातले असून अतिवृष्टीचा फटका शेतक-यांना बसला आहे. पावसाच्या पाण्यात शेतीसह घरदार वाहून गेल्याने शेतक-यांचा संसार उघड्यावर पडला आहे. सोलापूरात दोन बहिणींचे


शैक्षणिक साहित्य पावसात वाहून गेल्याने त्यांची पिडा, अश्रु अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी या मुलींना शैक्षणिक साहित्य व दोन लॅपटॉप देण्याचा निर्णय घेतला असून त्यांची कन्या व युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील यांनी ही माहिती दिली.
उत्तर सोलापूर तालुक्यातील ति-हे गावातील दादा गायकवाड वस्तीत राहणा-या सायली व कोयल गायकवाड या दोन बहिणी स्पर्धा परिक्षाची तयारी करीत आहेत. मात्र सोलापूरात झालेल्या

अतिवृष्टीत या दोन्ही बहिणींचे शैक्षणिक साहित्य, पैसे पाण्यात वाहून गेल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. लॅपटॉप पाण्यात भिजल्याने तेही खराब झाले. त्यामुळे परिक्षेचा अभ्यास कसा करायचा असा यक्ष प्रश्न या बहिणींसमोर पडला होता. त्यांचे दुख, अश्रु, त्यांना होणारी यातना पाहून अख्खा महाराष्ट्र हळहळला. पुराची झळ कशी असते हे त्यांच्या डोळ्यातील अश्रुंनी दाखवुन दिले.

ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी तात्काळ या दोन्ही बहिणींना शैक्षणिक साहित्य तसेच दोन लॅपटॉप देण्याचा निर्णय घेतला. अशी माहिती त्यांची कन्या व युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील यांनी दिली.ML/ML/MS