असे प्रसंग जीवनातला काहीसा ताण कमी करतात

मुंबई, दि २२
आपल्या नातीच्या शाळेत “ग्रँड पेरेंट्स डे” ला ईशान्य मुंबईच्या खासदार संजय दीना पाटील यांनी आपल्या पत्नीसह लावली हजेरी.

खासदार संजय पाटील यांची नातं रेवा पाटील यांच्या शाळेत “ग्रँड पेरेंट्स डे” चे आयोजन केले होते. त्यात मुलांनी आपल्या आजी आजोबा यांना सोबत आणायचे होते. रेवा ही खासदार संजय पाटील यांची लडकी नात.

शाळेत नाती बरोबर गेल्यावर त्यांनी शाळेत फेरफटका मारला आणि रेवाच्या वर्गात जाऊन शिक्षक आणि इतर शिक्षकांशी गाठभेत घेतली. मुलांनी शाळेत केलेल्या कामाचे कौतुक केले आणि काही वेळ आपल्या नाती बरोबर आनंदात घालवला. रेवा पण आजोबा आणि आजी शाळेत आल्या मुळे खूप खुश होती.

आपल्या धाकाधाकिच्या जीवनात काही काळ आपण पण आपल्या शाळेच्या आठवणीत रमलो होतो..आणि असे प्रसंग जीवनातला काहीसा ताण कमी करतात असे खासदार पाटील यांनी यावेळी सांगितले.ML/ML/MS