खा. संजय दिना पाटील यांच्या मुळे दुचाकीस्वाराचा जीव वाचला

स्वत:चा ताफा थांबवून जखमीला नेले रुग्णालयात
मुंबई, दि. २२ – गंभीर जमखी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेल्या दुचाकी स्वाराला ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलवून त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आल्याने त्याच्यावर वेळीच उपचार झाले. त्यामुळे दुचाकीस्वाराचा जीव वाचला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील हे गोवंडी, शिवाजी नगर येथील कार्यक्रम आटपून नवी मुंबई येथील नेरुळ या ठिकाणी दी. बा. पाटील यांच्या नामकरण समितीच्या बैठकीला जात होते. त्यावेळी नेरुळ तेथे दुचाकी वाहनाचा अपघात झाला होता. या दुर्घटनेत एक दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन रस्त्याच्याकडेला पडला होता. खा. संजय दिना पाटील यांनी तात्काळ आपल्या गाडीचा ताफा थांबवून नजीकच्या रुग्णालयात फोन केला आणि रुग्णवाहिका मागवून घेतली. जखमींला तातडीने नजीकच्या रुग्णालयात घेऊन गेल्याने जखमींवर वेळीच उपचार झाले. त्यामुळे जखमी रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याने डॉक्टरांनी सांगितले. खा. संजय दिना पाटील यांनी माणुसकी दाखविल्याने त्या दुचाकीस्वाराचा जीव वाचविता आला.ML/ML/MS