भांडुप मध्ये खासदार निधीतून २ विविध उपक्रमाचे उदघाट्न…

 भांडुप मध्ये खासदार निधीतून २ विविध उपक्रमाचे उदघाट्न…

मुंबई, दि २
काल ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांच्या खासदार निधीतून भांडुप मतदार संघात २ विविध उपक्रमाचे उदघाटन झाले.
११३ अंतर्गत ओम गणेश मित्र मंडळ, मरोडा हिल, गावदेवी रोड, भांडुप (प.) येथे खुल्या सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन मा. आमदार व विभागप्रमुख श्री. रमेशजी कोरगावकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.


यावेळी मा.नगरसेविका दीपमाला बढे ताई, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते


शाखा ११० अंतर्गत म्हात्रे चाळ, भग्गू यादव चाळ, पाल चाळ (पंजाबी पत्रा चाळ), व्हिलेज रोड, भांडुप (प.) येथे नवीन प्रसाधनगृहाचे लोकार्पण मा. आमदार व विभागप्रमुख श्री. रमेशजी कोरगांवकर यांच्या शुभहस्ते तसेच मा. नगरसेवक श्री. सुरेशजी कोपरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *