शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे

मुंबई, दि १४
जश्ने उस्ताद-पार्कसाईट विक्रोळी ‘शिक्षण पुरस्कार’ या कार्यक्रमाला ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी उपस्थित राहून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार केला.

शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे. अशा उपक्रमांमधून अनेकांना नवी दिशा

मिळते, हा खरोखरच कौतुकास्पद उपक्रम आहे असे मनोगड खासदार संजय पाटील यांनी उपस्थित्यांच्या समोर व्यक्त केलं.

या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल खासदार संजय पाटील यांनी समद फाउंडेशन व श्री. सिराज अहमद यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच रायझिंग स्टार्स ट्युटोरियल्स व सर्व पदवीधर विद्यार्थिनींना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.ML/ML/MS