कवी, लेखक, समीक्षक संजय निकम यांना शेक्सपिअर आंतरराष्ट्रीय पुरस्कार

मुंबई, दि. १९ : मालेगांव येथील ख्यातनाम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कवी, लेखक, समीक्षक संजय मुकुंदराव निकम यांना जागतिक असा अतिशय मोठा मानाचा समजला जाणारा शेक्सपिअर ॲवॉर्ड हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आंतर राष्ट्रीय साहित्य समिती, अमेरिका या संस्थेतर्फे संजय मुकुंदराव निकम यांचा साहित्य व सामाजिक क्षेत्रातील विशेष अशा योगदानाबद्दल नुकताच लखनौ येथे एका शानदार सोहळ्यात गौरव करण्यात आला.
अध्यक्ष पीटर विल्यमा यांनी संजय निकम यांचा परिचय करुन दिला. ऍनी कॉर्बेट यांनी त्यांचे आभार मानले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कवी लेखक आणि समीक्षक संजय मुकुंदराव निकम यांना देश विदेशातील साहित्य रसिकांनी भरभरून शुभेच्छा संदेश पाठविले आहेत. त्यांचे या कार्याबद्दल भरभरून कौतुक होत आहे.ML/ML/MS