संजय राऊत म्हणाले हिंदू मुलांनीही अनेक मुलींचे खून केले आहेत

 संजय राऊत म्हणाले हिंदू मुलांनीही अनेक मुलींचे खून केले आहेत

नाशिक, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दिल्लीत श्रद्धा वालकरची तिचाच प्रियकर आरोपी आफताब पुनावालाने निर्घृणपणे हत्या केली. यानंतर राज्यभरात हिंदूत्ववादी संघटनांकडून लव्ह जिहादचा आरोप करत मोर्चे काढले जात आहेत. असाच एक मोर्चा नाशिकमध्ये झाला, त्यानंतर त्र्यंबकेश्वरमध्येही हा मोर्चा काढण्यात आला. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आलेल्या शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी लव्ह जिहादच्या आरोपावर प्रश्न विचारला. यावर राऊतांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले अनेक हिंदू मुलांनीही मुलींचे खून केले आहेत.Sanjay Raut said that Hindu boys have also killed many girls

संजय राऊत म्हणाले, “या विषयावर सर्वांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल. ही प्रकरणं लव्ह जिहादची आहेत की वेगळं काही आहे यामागे हे तपासावं लागेल. आफताबने केलेली श्रद्धाची हत्या अतिशय निर्घृण आहे. त्यानंतर अनेक मुलींचे खून हिंदू मुलांकडूनही झाले आहेत आणि अनेक मुलींना धमक्याही देण्यात आल्या आहेत. मुळात ही विकृती आणि अमानुषता आहे. यात जात धर्म न आणता देशातील प्रत्येक कन्येचं रक्षण झालं पाहिजे, अशी भूमिका घेतली पाहिजे,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड Shinde group MLA Sanjay Gaikwad यांनी केलेल्या शिवीगाळीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, “मला जर कोणी गद्दार शिव्या देत असेल, तर तो मी माझा सन्मान समजतो. त्यांना उत्तम शिव्या येत असतील, तर त्यांनी आधी या शिव्या राज्यपालांना, भाजपा मंत्री आणि प्रवक्ंत्याना देऊन दाखवाव्यात.”

ML/KA/PGB
3 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *