खा. संजय दिना पाटील यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) – ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी लालबागाचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी खासदार संजय दिना पाटील यांना स्मरणीका देऊन त्यांचा सन्मान केला.

नवसाला पावणारा अशी ज्याची ख्याती असलेला लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच लालबागला भक्तांची गर्दी दिसून येत आहे. अनेक सेलिब्रिटीज पहिल्या दिवसापासूनच दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत. आज सकाळी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी कडक पोलीस बन्दोबस्त ठेवण्यात आला होता.ML/ML/MS