विद्यार्थ्यांच्या भावना आणि मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्नशील

दिल्ली, दि २६: जे.एन.यू विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने काल महाराष्ट्र सदनात
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांची भेट घेतली.
यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठात अलीकडेच घडलेल्या घटनांची माहिती दिली. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या जेएनयूतील विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
या संदर्भात सर्व खासदारांनी शिक्षण मंत्रालय तसेच जे.एन.यू प्रशासनाकडे तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी विद्यार्थ्यांची स्पष्ट मागणी होती.
यावेळी खासदार संजय पाटील आश्वासन दिले कि ” विद्यार्थ्यांच्या भावना आणि मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे”.