भांडुप मध्ये भव्य पुस्तकांचे प्रदर्शन
मुंबई, दि. १५ – ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांचे वडील दिना बामा पाटील यांच्या ९१ व्या जयंती निमित्त दिना बामा पाटील ग्रंथालय, स्टडी सेंटर यांच्यावतिने ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आमदार, विभाग प्रमुख रमेश कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या मुख्य विश्वस्त पल्लवी पाटील, युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील यांची उपस्थिती होती.

कामगार नेते, माजी आमदार स्व. दिना बामा पाटील यांची २४ नोव्हेंबर रोजी ९१ वी जयंती आहे. त्यानिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. वाचनसंस्कृती वाढावी, रुजावी यासाठी अशा प्रकारचे प्रदर्शन दरवर्षी दिना बामा पाटील ईस्टेट, भांडुप रेल्वे स्थानकाजवळ भरविण्यात येते. यंदाही भरविण्यात आलेले प्रदर्शन १४ ते ३० नोव्हेंबर पर्यंत सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. पुस्तक


प्रेमींनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजक पल्लवी पाटील यांनी केले आहे. पुस्तक प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी अनेकांनी हजेरी लावून मोठ्या प्रमाणावर पुस्तके खरेदी केली. शालेय विद्यार्थ्यंच्या शिक्षणासाठी महत्त्वाची असलेली तसेच देश विदेशातील नामवंत लेखकांची अनेक दर्जेदार पुस्तके या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल त्याच प्रमाणे उद्योग कसा करावा, जेवण


रुचकर कसे करावे त्याचे विविध प्रकार, मुलांवर संस्कार कसे करावे या सारख्या अनेक विषयांवरील पुस्तके या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. दरम्यान २८ ते ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत पुस्तकांचे आदान प्रदान महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवात वाचलेले पुस्तक दान करुन तुमच्या आवडीचे उपलब्ध असलेले पुस्तक तुम्ही घेऊन जाऊ शकता.
मुंबईतील कामगारांचा आवाज, श्रमीकांचे नेते, आमदार स्व. दिन बामा पाटील यांच्या जयंती निमित्त भांडुप येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कामगारांचे कुटुंब, त्यांचा समाज सुधारण्यासाठी त्यांच्या पर्यंत शिक्षण पोहचले पाहिजे म्हणुन भांडुप, मुलुंड व कोकणासह मुंबई विभागात अनेक शिक्षण संस्थांना दिना बामा पाटील यांनी मदत केली. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पल्लवी पाटील यांनी दिना बामा पाटील वाचनालय व अभ्यासिकेची सुरवात केली. या संस्थेतून उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी मोठ मोठ्या पदांवर आपले कर्त्यव्य बजावत आहेत.ML/ML/MS