इन्फ्लुएंसर समाजातील मतप्रवाह घडवण्यात आणि सकारात्मक बदल घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

मुंबई, दि १४
नुकताच नवभारत इन्फ्लुएंसर समिट २०२५, नवभारत मीडिया ग्रुपतर्फे आयोजित, हॉटेल ताज द ट्रीज, विक्रोळी, मुंबई येथे पार पडला त्यात ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील व त्यांची समाजसेविका कन्या राजोल संजय पाटील हे उपस्थित होते.


या कार्यक्रमात कला, मनोरंजन आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्वांची उपस्थिती होती. प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता, विनोदी कलाकार सायरस ब्रोचा, गायिका पलक मुच्छल आणि संगीतकार मिथून यांचा त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी सन्मान करण्यात आला.
यावेळी खासदार संजय पाटील समाजमध्यमांशी बोलताना म्हणाले की…
“आजच्या काळात इन्फ्लुएंसर समाजातील मतप्रवाह घडवण्यात आणि सकारात्मक बदल घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अशा प्रेरणादायी कार्यक्रमाचा भाग होणे आणि मान्यवर व्यक्तींशी एकत्र येणे ही खरोखरच गौरवाची गोष्ट होती”. .

मा. खासदार अनुराग ठाकूरजी आणि नवभारत ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक श्री निमिष महेश्वरी जी यांच्यासोबत मंचावर सहभागी होण्याचा आनंद मिळाला.ML/ML/MS