खा. संजय दिना पाटील यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई, दि. १ – ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून गोवंडी येथील सीबीएसई शाळा आजपासून सुरु झाली आहे. पहिल्याच दिवशी मुलांचे वर्ग सुरु झाल्याने शिक्षक तसेच स्थानिकांनी खा. संजय दिना पाटील यांचे आभार मानले.

गोवंडी येथील नटवर पारेख कंपाऊंड मधील पालिकेची सीबीएसई शाळा सुरु व्हावी म्हणुन खासदार संजय दिना पाटील यांनी वारंवार पालिका आयुक्त भूषण गगराणी तसेच अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांची भेट घेऊन या शाळेचे काम तात्काळ करण्यासाठी सांगितले होते. याबाबत संबंधीत विभागाशी पत्रव्यवहार करुन त्याचा पाठपुरवठा घेण्यात आला होता. युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील यांनी आज शाळेत जाऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांची भेट घेतली.

विविध कारणास्तव या शाळेच्या इमारतीचे काम धीम्या गतीने सुरु म्हणुन खा. संजय दिना पाटील यांनी पालिका अधिका-यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. त्यामुळे इमारतीच्या कामाला वेग आला. इमारतीचे बांधकाम पुर्ण झाल्यावर शाळेत अग्निशमन दल व रुग्णवाहिका यांना जाण्यासाठी रस्ता नसल्याने एमएमआरडीएकडून इमारत

हस्तांतर करण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. खा. संजय दिना पाटील यांनी एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी व पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन रस्त्याचे काम युध्द पातळीवर करण्यास सांगितले. त्यानुसार एमएमआरडीए व पालिका अधिका-यांनी शाळा परिसराची पाहणी करुन तात्काळ रस्त्याच्या कामाला सुरवात केली. त्यानंतर एमएमआरडीएने शाळा पालिकेकडे हस्तांतर करुन दिल्यानंतर महिन्याभरातच शाळा सुरु झाल्याने पालक वर्गाने खा. संजय दिना पाटील यांचे आभार मानले.ML/ML/MS