मेट्रो-१ स्थानकांवर सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीनची सुविधा
मुंबई, दि. ९ : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो-१ मार्गिकेतील सर्व १२ मेट्रो स्थानकांवर सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) खासगी कंपन्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून मेट्रो स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमाअंतर्गत सिरोना या नामांकित कंपनीसोबत भागीदारी करण्यात आली असून, बहुउत्पादन मासिक पाळी स्वच्छता व्हेंडिंग मशीन स्थानकांवर बसवण्यात आल्या आहेत.
परवडणाऱ्या दरात मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेसाठी सॅनिटरी पॅडसह अन्य काही वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तेथे ४० रुपये किंमतीचे दोन सॅनिटरी पॅड १० रुपयात उपलब्ध करून देतानाच १० सॅनिटरी पॅडचे पाकीट ७० रुपयांत उपलब्ध करून देण्यात आले आहे. १० सॅनिटरी पॅडची किंमत १५० रुपये अशी असताना महिला प्रवाशांना हे पाकिट केवळ ७० रुपयांत दिले जात आहे.
SL/ML/SL