ऑस्ट्रेलियन ओपन अंतिम फेरीत सानिया-रोहन पराभूत
मेलबर्न,दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज येथे झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीची अंतिम फेरीत भारताची स्टार टेनिसपटू जोडी सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांचा पराभव झाला. लुईसा स्टेफनी आणि राफेल मॅटोस या ब्राझीलच्या जोडीने सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा या भारतीय जोडीचा ७-६ (२), ६-२ असा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने आपल्या अखेरचा ग्रँडस्लॅम सामना खेळला आहे. या सामन्यात तिला हार पत्करावी लागला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन २०२३ च्या मिश्र दुहेरीच्या विजेतेपदाच्या सामन्यात ०-२ ने पराभूत झाल्यानंतर भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाला अश्रू अनावर झाले. सानिया मिर्झा भावूक झाली आणि म्हणाली, “माझ्या व्यावसायिक करिअरची सुरुवात मेलबर्नमध्ये 2005 साली झाली. ग्रँडस्लॅम कारकिर्दीला निरोप देण्यासाठी यापेक्षा चांगली जागा असूच शकत नाही. विजेतेपद जिंकल्याबद्दल तिने ब्राझीलच्या जोडीचे अभिनंदनदेखील केले.”
सानियाने आतापर्यंत एकूण सहा ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. यातील महिला दुहेरीत तीन आणि मिश्र दुहेरीत तीन विजय मिळवले आहेत. तर रोहन बोपण्णा याने मिश्र दुहेरीत एकदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले आहे.
SL/KA/SL
27 Jan. 2023