कृष्णा आणि वारणा दुधडी भरून वाहत असल्याने नागरिकांचे स्थलांतर

सांगली दि २०:- सांगली जिल्ह्यात रात्रभर संततधार पाऊस पडत आहे. वारणा नदी पाणी पातळीत वाढ झाल्यानं शिराळा तालुक्यातील चरण-सोंडोली पूल, आरळा- शित्तूर पूल, बिळाशी- भेडसगाव पूल, मांगले -सावर्डे पूल, मांगले- कांदे पूल, कांदे -सावर्डे पूल पाण्याखाली गेले आहेत.बॅरिगेटिंग करून वाहतूक बंद करण्यात आली आहे. कृष्णा नदी पाणी पातळीत देखील वाढ झाल्यानं महानगरपालिका क्षेत्रातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट येथील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.
सकाळी 9 वाजता सांगलीतील आयर्विन पूलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी34 फूट 9 इंच होती. इशारा पातळी 40 फूट तर धोका पातळी 45 फूट आहे. मिरज कृष्णा घाट इथं कृष्णा नदीची पाणी पातळी 43 फूट 9 इंच होती. इशारा पातळी 45 फूट तर धोका पातळी 57 फूट आहे.
सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील पाण्याखाली असलेले बंधारे
1) बहे
2) बोरगाव
3) नागठाणे
4) डिग्रज
5) सांगली
6) म्हैशाळ
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे त्यामुळे कृष्णा नदी ची पाणी पातळी वाढत आहे, त्यामुळे औदूंबर येथील दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे, रात्री दत्तांची उत्सव मूर्ती जुन्या देव घर येथे हलवली आहे. तर सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने NDRF च्या टीम ला अलर्ट रहा अश्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कोणती हि आपत्ती आली तर बचाव आणि मदत कार्या साठी NDRF चे जवान सज्ज आहेत. कर्नाळ रोड आणि आयर्विन पुलाजवळ NDRF च्या टीमने पाहणी केली आहे.ML/ML/MS