सुधारित तंत्राने पानमळ्याची उभारणी केल्यास शेतकरी फायद्यात.
सांगली , दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खायची पाने अर्थात विड्याची पाने विकासासाठी आधुनिक तंत्राचा वापर करणे आवश्यक आहे. तशी केल्यास पान उत्पादक शेतकरी फायद्यात येणार आहेत. पहिली गुंतवणूक एकरी 60 हजार रुपयांची असली तरी सदर शेतकऱ्यांना दरवर्षी चार लाखाचे उत्पन्न मिळणार आहे.
सांगली जिल्ह्यात पान उत्पादक शेतकऱ्यांना सध्या चांगले दिवस आले आहेत. गणेश उत्सव आणि सणासुदीच्या कालावधीमुळे सर्वत्र पानाची मागणी वाढली आहे. त्यामुळे पानाच्या दरात पाचशे रुपये पासून ते एक हजार रुपयापर्यंत वाढ झाली आहे. पान बाजारात कलकत्ता पानास चांगली मागणी असली तरी यावेळी प्रथमच कतरी पानाच्या दराने उचल खाली आहे. त्यामुळे मिरज पूर्व भागातील पान उत्पादक आपला माल राज्याच्या अनेक भागात विक्रीसाठी पाठवू लागले आहेत यापूर्वी येणाऱ्या दरापेक्षा यावेळी पान उत्पादक शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत.
ML/ML/PGB 19 Sep 2024