सांगलीत भारतीय सैन्य दलाकडून मदत कार्य सुरु

सांगलीत भारतीय सैन्य दलाकडून मदत कार्य सुरु
सांगली, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी आज दुपार पर्यंत स्थिर होती, सांगलीतील आरवाडे प्लॉट, सूर्यवंशी प्लॉट, कर्नाळ रोड वरील घरात अजून ही पुराचं पाणी आहे. सांगलीतील सूर्यवंशी प्लॉट येथील
पूरग्रस्त नागरिकांनसाठी भारतीय सैन्य दलाकडून मदत कार्य सुरु केले आहे.
आज बोटीतून जाऊन भारतीय सैन्य दलातील जवानांनी पूरग्रस्त नागरीकांना धान्य,भाज्या, ब्रेड, दूध, फळ, यांचे वाटप केले तर भारतीय सैन्य दलाच्या डॉक्टरांच्या कडून सूर्यवंशी प्लॉट येथील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली . जे लोक आजारी आहेत त्यांना औषधाचे वाटप ही करण्यात आले आणि आरोग्याच्या बाबतीत सल्लाही देण्यात आला.
यावेळेस मेजर शाकेत पांडे, लेफ्टनंट आदित्य, मेजर डॉ. विनायक, सुभेदार सुरेश कुमार, नायब सुभेदार प्रदीप रावत यांच्या उपस्थित हे मदत कार्य करण्यात आले. यावेळेला मेजर शाकेत पांडे यांनी नागरिकांची माहिती घेत, त्यांना कोणत्या गोष्टीची गरज आहे, आणि समस्या बाबत माहिती जाणून घेतली.
ML/ML/PGB
4 Aug 2024