पूरस्थिती मुळे सांगलीतील कैदी कोल्हापुरात हलवले

 पूरस्थिती मुळे सांगलीतील कैदी कोल्हापुरात हलवले

सांगली, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :संभाव्य पूरस्थिती मुळे, सांगली तुरुंगातील कैदी कोल्हापूरच्या कळंबा जेलला हलवले आहेत.सध्या 80 कैदी पाठवले असून उर्वरित कैदी पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे.सांगलीतील पूरपरिस्थिती गंभीर बनत चालली आहे. वारणा आणि कोयना नदीतून सततच्या वाढत्या विसर्गामुळे सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फुटावर जाऊन पोहोचली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर 2019 च्या महापुरामध्ये जसे पुराचे पाणी जेलमध्ये शिरले होते. त्याप्रमाणे परिस्थिती उद्भवू शकते. या पार्श्वभूमीवर या वर्षी सांगली कारागृह प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कैद्याना कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये पाठवले आहे. आज या लहिल्या फेरीत 80 कैद्याना पाठवण्यात आले आहे. यामध्ये 20 स्त्रिया असून 60 पुरुष कैद्यांचा समावेश आहे. उर्वरित कैद्याना पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे . कारागृहातील सर्व रेकॉर्ड, लॅपटॉप, कॉम्प्युटर्स, धान्य, भाज्या, औषधे, कपडे इत्यादी सामुग्री सुरक्षित स्थळी ठेवण्यात आली असून कारागृह प्रशासन कृष्णा नदीच्या महापुरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस तोंड देण्यास सज्ज आहे. अशी माहिती कारागृह अधीक्षक महादेव होरे यांनी दिली आहे.

PGB/ML/PGB 26 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *