संगीतभूषण पं. राम मराठे महोत्सव हा रसिकांसाठी पर्वणी
ठाणे, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संगीत साधनेत यशस्वी होऊन वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी पद्मभूषणपुरस्काराने सन्मानित होणाऱ्या ख्यातकीर्त गायिका बेगम परविन सुलताना यांच्या दमदार गायकीने यावर्षीच्या राम मराठे संगीत महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी राम गणेश गडकरी रंगायतन येथे झाली.Sangeetbhushan Pt. Ram Marathe Mahotsav is a festival for lovers
आम्ही कलाकार पुजारी आहोत , रसिक प्रेक्षक आमचे देव असून रसिकांच्या मंदिरात येवून आम्ही कलेची पूजा करीत असतो. ठाणे महापालिकेने संगीतभूषण पं. राम मराठे महोत्सव आयोजित करुन कलावंतांना कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल ठाणे महापालिकेचे त्यांनी आभार व्यक्त करीत हा महोत्सव म्हणजे ठाणेकरांसाठी पर्वणी असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित संगीत भूषण पं. राम मराठे महोत्सवाचा शानदार शुभारंभ शुक्रवारी राम गणेश गडकरी रंगायतन येथे झाला. यावेळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, आमदार ॲङ निरंजन डावखरे, अतिरिक्त आयुक्त१संदीप माळवी, आदी उपस्थित होते.
गेली 45 वर्षे कथ्थ्क या नृत्यप्रकाराची अतुलनीय साधना करुन आजवर कथ्थक नृत्याच्या अनेक शिष्या घडविणाऱ्या डॉ. मंजिरी देव यांना रोख रुपये 51,000/- सन्मानचिन्ह देवून संगीतभूषण पं. राम मराठे राज्यस्तरीय पुरस्काराने तर गेली 20 वर्षे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेणाऱ्या व 10 वर्षे अध्यापनाचे काम करीत संगीताची साधना करणाऱ्या दीपिका भिडे- भागवत यांना रोख रुपये 25,000/- सन्मानचिन्ह देवून पं. राम मराठे युवा पुरस्कार पद्मभूषण परवीन बेगम सुलताना यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
गडकरी रंगायतन ही वास्तू जेव्हा निर्माण झाली त्यावेळी मी या ठिकाणी नृत्य सादर केले आहे. ज्या रंगमंचावर नृत्य सादर केले, त्याच रंगमंचावर ठाणे महानगरपालिकेने संगीतभूषण पं. राम मराठे यांच्या नावाने दिलेला पुरस्कार स्वीकारताना मला विशेष आनंद होत आहे. रंगदेवता प्रसन्न असलेली गडकरी रंगायतन ही वास्तू असल्याचेही डॉ. मंजिरी देव यांनी सत्काराला उत्तर देताना नमूद केले.
ML/KA/PGB
3 Dec .2022