अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक अशा विविध कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील कलाकारांना दरवर्षी संगीत नाटक अकादमी प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. २०२२-२३ वर्षासाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाले असून नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.. त्याच बरोबर हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली, अभिनेत्री ऋतुजा बागवेसह अभिनय आणि संगीत क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या अन्य काही मान्यवरांनाही संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाले आहेत.
संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी
- अशोक सराफ, अभिनय
- विजय शामराव चव्हाण, ढोलकीवादक
- कलापिनी कोमकली, हिंदुस्तानी शास्त्रीय सगीत
- नंदिनी परब गुजर, सुगम संगीत
- सिद्धी उपाध्ये, अभिनय
- महेश सातारकर, लोकनृत्य
- प्रमिला सूर्यवंशी, लावणी
- अनुजा झोकरकर, हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका
- सारंग कुलकर्णी, सरोद वादक
- नागेश आडगावकर, अभंग संगीत
- ऋतुजा बागवे, अभिनय
- प्रियांका शक्ती ठाकूर, पारंपारिक कला
काही दिवसांपूर्वीच त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अशोक सराफ यांनी १९६९ पासून चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी २५० हून अधिक मराठी चित्रपट केले, त्यापैकी १०० व्यावसायिक हिट ठरले. त्याने कॉमेडी सिनेमांमधून तुफान लोकप्रियता मिळवली. आता अशा या नटसम्राटाची मोठा सन्मान करण्यात येणार आहे.इंडस्ट्रीत येण्यापूर्वी अशोक सराफ बँकेत काम करत होते. त्यांना आधीपासूनच अभिनेता व्हायचं होतं, पण त्यांनी वडिलांचा शब्द पाळत, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी सुरू केली. त्यासोबतच आपला अभिनयाचा छंद जोपासत ते नाटकांत काम करू लागले. पुढे त्यांनी आपल्या अभिनयाने रसिकांना अक्षरश: वेड लावलं. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या कलाकाराने मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोलाचं योगदान दिलं.
विख्यात शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली (Kalapini Komkali) यांना संगीत नाटक पुरस्कार जाहीर झाला. तसेच प्रसिद्ध सतार वादक नीलाद्री कुमार यांनाही संगीत नाटक पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीत नाटक अकादमीच्या वतीने 2023 या वर्षासाठी संगीत, नाटक, नृत्य क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा केली आहे. एक लाख रुपये आणि ताम्रपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.कलापिनी कोमकली या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील अलौकिक स्वरतपस्वी पंडित कुमार गंधर्व यांची कन्या आहेत. आपल्याकडे असलेला सुरांचा अलौकिक ठेवा जपतानाच शास्त्रीय संगीतात त्यांनी स्वत:ची गायनशैली घडवली आहे.
SL/KA/SL
28 Feb. 2024