प्रशांत दामलेसह टिकेकर, नाईक यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार

 प्रशांत दामलेसह टिकेकर, नाईक यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार

नवी दिल्ली,दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संगीत नाटक अकादमीने शुक्रवारी (दि.२५)  2019, 2020 आणि 2021 असे तीन वर्षांचे पुरस्कार एकत्रित जाहीर केले. संगीत, नृत्य, नाट्य क्षेत्रांत अमूल्य योगदान दिल्याबद्दल संगीत नाटक अकादमीकडून ​फेलोशिप आणि पुरस्कार दिले जातात. अभिनेते प्रशांत दामले, शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर आणि अभिनेत्री मीना नाईक हे मराठी कलाकार या पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत.

त्याचबरोबर पुणे येथील नृत्य दिग्दर्शक नंदकिशोक कपोते आणि ज्येष्ठ नृत्यांगना शमा भाटे  यांना देखील संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. Sangeet Natak Academy Award Prashant Damle Aarli Ankalikar Tikekar meena naik

तीन दशकांहून अधिक काळ रंगभूमी गाजवणारे अभिनेते प्रशांत दामले यांनी नुकताच त्यांच्या नाट्य कारकीर्दीतील 12 हजार 500 वा प्रयोग सादर केला. त्यांच्या या कामाचे कौतुक करत अकादमी हा पुरस्कार जाहीर केला आहे.

प्रशांत दामले यांनी हा पुरस्कार जाहीर झाल्याची पोस्ट करत आपल्या प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.  ‘आपल्या सर्वांच्या अलोट प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे मला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला. असच प्रेम असु दे.’ त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. चाहते त्यांच्या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका मीना नाईक (Meena Naik) यांना पपेट्रीसाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

संगीत नाटक अकादमी पुरस्कार विविध कलाक्षेत्रातील कलावंतांना देण्यात येणारा हा एक सर्वोच्च भारतीय सन्मान आहे. संगीत, नृत्य अभिनय इतर पारंपरिक समूह नृत्य, आदिवासी नृत्य, संगीत, अभिनय आणि कठपुतळी यांतील योगदानांबद्दल हे पुरस्कार प्रदान केले जातात.

SL/KA/SL

26 Nov. 2022

 

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *