सकाळी न्याहारीला बनवा, सिंधी कोकी
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ही नवीन कृती धपाट्याच्या जवळ जाते आहे, फक्त ज्वारीचं पीठ नाही यात. नक्की ट्राय करुन पहा.
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
दोन वाटी गव्हाचे पिठ
मिरची आणि जिरे पेस्ट चवीनुसार
तूप ५ ते ६ (पोहा) चमचे
भरड केलेली धणे पूड
कोथींबीर बारीक चिरून
एक कांदा बारीक चिरून
कांदा पात बारीक चिरलेली
गाजर किसून – १ बारीक
मीठ चवीनुसार
पाणी आणि तेल कणीक मळायला.
क्रमवार पाककृती:
प्रथम गव्हाच्या पीठात चवीनुसार मीठ घालायचं. त्यात तूप घालून ते पिठाला चांगलं दहा मिनिट लावून घ्यायचं. आता त्यात उर्वरित जिन्नस घालून आणि पाणी घालून कणीक मळून घ्यायची. पंधरा वीस मिनिटं कणीक मुरू द्यायची.
आता ह्या कणकेचे जाडसर पराठे लाटायचे. आणि मंद आचेवर तेल लावून शेकून घ्यायचे. हे मंद आचेवरच करायचे आहे. मस्त खुसखुशीत लागतात. दोन तीन दिवस तरी आरामात टिकतात.
ML/KA/PGB 27 Dec 2023