सदावर्तेंची सनद रद्द

 सदावर्तेंची सनद रद्द

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा या संघटनेने ऍड गुणरत्न सदावर्तें यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार करताना अ‍ॅड. सुशील मंचरकर यांनी वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन म्हटले होते. मंचरकर यांनी बार काऊंसिल ऑफ महाराष्ट्रकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. गुणरत्न सदावर्ते हे पेशाने वकील असतानाही सामाजिक पातळीवर वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. एसटी आंदोलनात वकिलांचा ड्रेस परिधान करुन सहभाग घेणे, पाठिंबा देणे आणि एसटी कर्मचाऱ्यांसोबत बैठका घेणे हे वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे म्हटले होते.Sanad of Sadavart is cancelled

या तक्रारीची दखल घेत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रने सदावर्ते यांना 7 फेब्रुवारी रोजी नोटीस बजावून शिस्तभंगाची कारवाई सुरु केली होती. मात्र ही कारवाई राजकीय हेतून प्रेरित आहे, असा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता. या कारवाईविरोधात सदावर्तेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मुंबई हायकोर्टात धाव घेतल्यानंतर न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. कोर्टाने सदावर्तेंना जोरदार शब्दात फटकारले. तुमच्याविरोधातील तक्रार राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला म्हणून तुम्हाला विशेष वागणूक देणार नाही. प्रथमदर्शनी महाराष्ट्र बार कौन्सिलच्या नोटिशीमध्ये काही चुकीचे दिसून येत नाही. अशा स्थितीत आम्ही तुम्हाला बार कौन्सिलविरोधात चुकीचा प्रचार करता येणार नाही, असे खंडपीठाने सदावर्ते यांना बजावले.

ML/KA/PGB
28 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *