सुमारे ७ लाख विद्यार्थी समूह गीत गायन करून रचणार विक्रम!

 सुमारे ७ लाख विद्यार्थी समूह गीत गायन करून रचणार विक्रम!

मुंबई, २२
महाराष्ट्र शासनाचे अल्पसंख्याक विकास विभाग तसेच राज्यस्तरीय समागम समितीद्वारा ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागमचे दिनांक २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी नवी मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनप्रवासावर आधारित गीताचे मुंबईतील ७ लाख १४ हजार ६२६ विद्यार्थी सोमवार, दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी समूह गायन करणार आहेत. यापैकी सकाळच्या सत्रातील विद्यार्थी सकाळी ९ वाजता तर दुपारच्या सत्रातील विद्यार्थी दुपारी १ वाजता शाळेच्या परिपाठावेळी गायन करतील.

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सर्व महानगरपालिका प्राथमिक, माध्यमिक, खाजगी अनुदानित, विना अनुदानित व अन्य मंडळांच्या एकूण २ हजार ३२१ शाळांमधील विद्यार्थ्यांसह राज्यभरातील सुमारे ५१ लाख विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ कडून या विक्रमासाठी नोंद घेण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाचे अल्पसंख्याक विकास विभाग तसेच राज्यस्तरीय समागम समितीद्वारा ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागमचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेदरम्यान ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर, नवी मुंबई येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या निमित्ताने उपायुक्त (परिमंडळ-६) श्री. संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण आणि आरोग्य विभाग यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचन, वक्तृत्व, चित्रकला, निबंध आदी स्पर्धांचे तसेच प्रभात फेरी, आरोग्य शिबीर आदी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

याच अनुषंगाने, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करण्यासाठी ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनप्रवासावर आधारित प्रसिद्ध गायक सरताज सिंग यांनी स्वरबद्ध केलेल्या गीताचे सामूहिक गायन करण्यात येणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सर्व महानगरपालिका प्राथमिक, माध्यमिक, खाजगी अनुदानित, विना अनुदानित व अन्य मंडळांच्या एकूण २ हजार ३२१ शाळांमधील ७ लाख १४ हजार ६२६ विद्यार्थी सोमवार, दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध ठिकाणांहून एकाचवेळी हे समूह गायन करतील. यापैकी सकाळच्या सत्रातील विद्यार्थी सकाळी ९ वाजता तर दुपारच्या सत्रातील विद्यार्थी दुपारी १ वाजता शाळेच्या परिपाठावेळी समूह गायन करतील. तर, संपूर्ण राज्यभरातील सर्व शाळांमधून सुमारे ५१ लाख विद्यार्थी यात सहभागी होतील.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *