जगातील पहिला 130 इंचाचा Micro RGB TV
मुंबई, दि. ७ : SAMSUNG Electronics ने CES 2026 मध्ये जगातील पहिला 130-इंचाचा मायक्रो RGB टीव्ही लाँच केला आहे. सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात मोठा मायक्रो RGB डिस्प्ले असलेला हा टिव्ही आहे. या टीव्हीमध्ये अॅडव्हान्स्ड AI पिक्चर प्रोसेसिंग, फुल BT.2020 कलर कव्हरेज आणि नवीन फ्रेम-फोकस्ड डिझाइन आहे. यात एआय फुटबॉल मोड प्रो, एआय साउंड कंट्रोलर प्रो, लाईव्ह ट्रान्सलेट, जनरेटिव्ह वॉलपेपर, मायक्रोसॉफ्ट कोपायलट आणि पर्प्लेक्सिटी सारखी वैशिष्ट्ये देखील समाविष्ट आहेत.
सॅमसंगने लॉंच केलेल्या 130 इंचाचा मायक्रो RGB टीव्ही पारंपारिक टीव्हीसारखा नसून एक आर्किटेक्चरल एलिमेंटसारखा डिझाइन केलेला आहे. तसेच यात मजबूत आणि रुंद फ्रेम स्क्रीनसह एक नवीन टाईमलेस फ्रेम डिझाइन संपूर्ण पॅनेलला एकसमान बॉर्डरने कव्हर करते, ज्यामुळे हा स्मार्ट टिव्ही आर्ट गॅलरीसारखे दिसतो.
या टीव्हीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची ऑडिओ सिस्टम, ज्यामध्ये स्पीकर्स थेट फ्रेममध्ये एकत्रित केलेले आहेत. सॅमसंगच्या मते 130 -इंच स्क्रीनसाठी ध्वनी कॅलिब्रेट केला आहे जेणेकरून आवाज थेट स्क्रीनवरून येत असल्याचे ऐकायला येतं. यात एक्लिप्स ऑडिओ तंत्रज्ञान देखील आहे, जे उत्कृष्ट आवाज प्रक्रिया आणि एक इमर्सिव्ह ऑडिओ अनुभव प्रदान करते.
SL/ML/SL