उच्चदाब वाहिनीच्या कामासाठी या दिवशी समृद्धी महामार्ग बंद

जालना, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावरील जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूची वाहतूक ही पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरच्या कामासाठी 25 आणि 26 ऑक्टोबर या दोन दिवशी दुपारी 12 ते दुपारी 3 या वेळेत बंद करण्यात आली आहे.मात्र इतर वेळेत समृध्दी महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे चालू राहील,अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता तथा प्रकल्प संचालक यांनी कळविली आहे. Samriddhi Highway closed on this day for high pressure channel work
समृध्दी महामार्गावरील जालना इंटरचेंज (आयसी – 14) ते सावंगी इंटरचेंज (आयसी – 16) दरम्यान समृध्दी महामार्गावरुन नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक, निधोना (जालना) इंटरचेंज क्र. आयसी – 14 मधून बाहेर पडून निधोना एमआयडीसी मार्गे राष्ट्रीय महामार्ग 756 अ (जालना – छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज क्र. आयसी – 16 (छत्रपती संभाजीनगर ) येथे समृध्दी महामार्गावर प्रवेश करुन शिर्डीकडे रवाना होईल. तर समृध्दी महामार्गावरील शिर्डीकडून नागपूर कडे जाणारी वाहतूक, ‘सावंगी इंटरचेंज क्र. आयसी – 16 (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडुन वर नमूद केलेल्या मार्गावरुन (विरुध्द दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. आयसी -14’ या ठिकाणी समृध्दी महामार्गावर प्रवेश करुन नागपूरकडे रवाना होईल, असेही अधिक्षक अभियंता यांनी कळविले आहे.
ML/KA/PGB
24 Oct 2023