महापालिका समिती वाटपामध्ये नगरसेविका वनिता नरवणकर यांना डावलले.

 महापालिका समिती वाटपामध्ये नगरसेविका वनिता नरवणकर यांना डावलले.

मुंबई, दि १९

महापालिकेतील वैधानिक समित्यांच्या नव्या वाटपात नवनिर्वाचित शिवसेना नगरसेविका वनिता नरवणकर यांना एकाही समितीवर स्थान न मिळाल्याने शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाची चर्चा पुन्हा रंगली आहे.
दक्षिण मुंबईतून शिवसेना शिंदे गटाच्या फक्त दोनच नगरसेविका निवडून आल्या त्यातील एक नगरसेविका यामिनी जाधव यांची स्थायी समितीवर वर्णी लागली असून दुसऱ्या निवडून आलेल्या वनिता नरवणकर यांची कोणत्याही समिती वर वर्णी लागली नाही. वनिता नरवणकर या शिवसेनेच्या विभाग प्रमुख माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्या पत्नी आहेत. दत्ता नरवणकर यांचा वॉर्ड महिला झाल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी देऊन निवडून देखील आणले. परंतु त्यांच्या पत्नीला कोणत्याही समिती वरती घेण्यात आली नसल्याने नरवणकर कुटुंबीय देखील नाराज असल्याची चर्चा आहे.
शिवसेना नवनिर्वाचित नगरसेविका वनिता नरवणकर यांना यंदाच्या समिती वाटपात स्थायी, सुधार, शिक्षण किंवा बेस्ट अशा कोणत्याही वैधानिक समितीवर संधी देण्यात आलेली नाही.

शिवसेनेच्या अंतर्गत समीकरणांची चर्चा

वनिता नरवणकर यांना कोणते तरी समिती वरती स्थान प्राप्त होईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नसल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. वरळी मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाची एकच नगरसेविकेची जागा आली असल्याने त्यांना कोणत्यातरी समितीवर स्थान मिळेल हे नक्की होतं. परंतु शिवसेनेमधील अंतर्गत वादामुळे त्यांना कोणतेही स्थान मिळाले नाही अशी चर्चा विभागात रंगली आहे. वरळी विधानसभेमध्ये शिवसेना उद्धव सेनेचे तीन तीन आमदार आहेत परंतु शिवसेना शिंदे गटाची हे एकच नगरसेविका निवडून आल्याने त्यांना समितीमध्ये स्थान देणे क्रमांक प्राप्त होते परंतु तसे झाले नसल्याने अनेकांचे भुवया उंचावलेल्या आहेत. शिवसेनेचे युवा प्रमुख माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी आपल्या पत्नीला या ठिकाणी निवडून आणून दाखवून त्यांनी वैयक्तिक राजकीय ताकद सिद्ध केली असली, तरी समितीबाहेर राहिल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे. जर मातब्बर नेत्याच्या पत्नीला जर समितीमध्ये स्थान मिळत नसेल तर सामान्य शिवसैनिकांला कसा न्याय मिळेल याचे उत्तम मूर्तीमंत उदाहरण नरवणकर हे आहे.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *