माजी खासदार समीर भुजबळ यांचे विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभीष्टचिंतन

नाशिक,दि.९ :- राज्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची सामाजिक जाण ठेवत, माजी खासदार समीर भुजबळ यांनी यंदा आपला वाढदिवस कोणताही भव्य कार्यक्रम न करता नाशिक येथील भुजबळ फार्म कार्यालयात साधेपणाने साजरा केला. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पगुच्छ देत माजी खासदार समीर भुजबळ यांचे अभीष्टचिंतन केले. तसेच यावेळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा, विकास दृष्टिकोनाचा आणि समाजाभिमुख उपक्रमांचा गौरव केला. विशेष म्हणजे माजी खासदार समीर भुजबळ यांनी या निमित्ताने सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श ठेवत पुष्पगुच्छ, शाल, हार किंवा भेटवस्तू न आणता शुभेच्छा देण्यासाठी विविध विषयांवरील पुस्तके आणण्याचे आवाहन केले होते. नागरिकांनी यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने पुस्तके भेट दिली. ही सर्व पुस्तके लवकरच जिल्ह्यातील विविध वाचनालयांना वाटप करण्यात येणार असल्याचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितले. वाचन संस्कृतीचा प्रसार आणि ज्ञानवृद्धी हीच खरी सामाजिक सेवा आहे, असे मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
राज्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या संकटमय परिस्थितीची सामाजिक जाण ठेवत, माजी खासदार समीर भुजबळ यांनी यंदा आपला वाढदिवस कोणताही भव्य सोहळा न करता साधेपणाने साजरा केला. वाढदिवसाच्या या अभिनव उपक्रमामुळे सामाजिक जाणिवा, शैक्षणिक मूल्ये आणि वाचनाची आवड वाढविणाऱ्या नेतृत्त्वाचे दर्शन घडल्याचे उपस्थितांनी सांगितले.
यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार जयवंतराव जाधव, समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, नाशिक म्हाडाचे अध्यक्ष तथा शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कर्डक, नानासाहेब महाले, ज्ञानेश्वर जगताप, शिवाजी चुंभळे, गोरख बोडके, आनंद सोनवणे, के.के.वाघ शिक्षण संस्थेचे अजिंक्य वाघ, जयप्रकाश जातेगावकर, माजी नगराध्यक्ष सुनील मोरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, निवृत्ती अरिंगळे, जगदीश पवार, मनोहर कोरडे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्षा योगिता आहेर, कविता कर्डक, डॉ.हेमलता पाटील, वसंत पवार, भाऊसाहेब भवर, प्रीत्येश गवळी, डॉ.योगेश गोसावी, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, मोहन शेलार, नागेश गवळी, पूजा आहेर, आशा भंदुरे, सुनैना यवतकर, योगिता पाटील, मीनाक्षी काकळीज,अनिता भामरे, डॉ.श्रीकांत आवारे, उदय जाधव, मनीष रावल, पांडुरंग राऊत, मनोज घोडके, योगेश कमोद, महेश भामरे, मकरंद सोनवणे, संदीप बोडके, अमर वझरे, अमोल महाले, संजय करंजकर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीस मदत
माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ए.के.इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक आदित्य भारत कानडे यांच्या वतीने राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.ML/ML/MS