या आशियाई देशात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता

 या आशियाई देशात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता

बँकाॅक, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेसारख्या व्यक्तीस्वातंत्रवादी देशात नवनियुक्त पंतप्रधान ट्रम्प यांनी जगात फक्त दोनच लिंग आहेत.’ असे वक्तव्य केले असतानाच आशिया खंडातील एका देशाने धाडसी निर्णय घेतला आहे. पूर्व आशियाई देश थायलंडमध्ये कालपासून समलिंगी विवाह कायदेशीर झाला आहे. यानंतर अनेक समलिंगी जोडप्यांनी विवाह नोंदणी केली. एएफपी न्यूज एजन्सीनुसार, थायलंड हा तैवान आणि नेपाळनंतर आशियातील तिसरा मोठा देश आहे, ज्याने समलिंगी विवाहाला मान्यता दिली आहे. यावेळी थायलंडचे माजी पंतप्रधान श्रेष्ठ थाविसिन म्हणाले की, आपण अमेरिकेपेक्षा अधिक खुल्या विचाराचे आहोत.

त्याच वेळी पंतप्रधान पटोंगटार्न शिनावात्रा यांनी X वर लिहिले – आज इंद्रधनुष्य ध्वज (गे ध्वज) थायलंडवर अभिमानाने फडकत आहे. नवीन विवाह कायद्यात पुरुष, स्त्री, पती-पत्नी याऐवजी जेंडर न्यूट्रल हा शब्द वापरण्यात आला आहे. नव्या कायद्यात ट्रान्सजेंडरनाही लग्न करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर थाई अभिनेता अपिवत पोरशा याने त्याचा जोडीदार सप्पन्यो आर्मसोबत विवाह नोंदणी केली. आर्म म्हणाला- यासाठी आम्ही अनेक दशके संघर्ष केला आणि आजचा दिवस ऐतिहासिक आहे. प्रेम तर प्रेम आहे.

या कायद्याच्या अंमलबजावणीवरून थायलंडचे माजी पंतप्रधान श्रेष्ठ थाविसिन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा समाचार घेतला. ते म्हणाले- अलीकडेच एका देशाच्या एका नेत्याने सांगितले होते की, दोनच लिंग आहेत, पण मला वाटते की आपण त्यांच्यापेक्षा अधिक खुल्या विचाराचे आहोत.

या कायद्याला थायलंडचे राजा महा वजिरालोंगकॉर्न यांनी सप्टेंबरमध्ये मंजुरी दिली होती, त्यानंतर 120 दिवसांनी हा कायदा लागू झाला. थायलंडमध्ये, LGBTQ+ समुदायाच्या अधिकारांना खूप महत्त्व दिले जाते. थाई कार्यकर्ते समलिंगी विवाह हक्कांना मान्यता मिळण्यासाठी दशकभरापासून प्रयत्न करत आहेत, परंतु देशातील राजकीय गोंधळामुळे या हालचालीला वारंवार विलंब होत आहे.

SL/ML/SL

24 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *