संभाजी महाराजांची हत्या ब्रिटिशांनी केली ….
मुंबई दि १० (एमएमसी न्यूज नेटवर्क): धर्मवीर संभाजी महाराजांना ब्रिटिशांनी पकडुन त्यांची हत्या केली अशी मुक्ताफळे कर्नाटकातील काँग्रेस आमदार सतीश जारकीहोळी यांनी उधळली आहेत , त्यांचे हे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मान्य आहे का असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
एका कार्यक्रमादरम्यान जारकीहोळी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले असून शिवाजी महाराजांच्या जेवणात विष मिळाल्याच्या घटनेतून हा प्रकार घडला असेही आणखी वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.
फडणवीस यांनी हा व्हिडिओ ट्विट करीत सवाल उपस्थित केला आहे.
SL/KA/SL
10 Nov. 2022