संभाजी ब्रिगेडने शिवसेने उबाठा सोबतची युती तोडली
पुणे, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटासोबत असणारी गेले दोन ते अडीच वर्षाची युती तोडणार असल्याची घोषणा आज पुण्यात संभाजी ब्रिगेड कडून करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली असून विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडला योग्य मान मिळाला नसल्याचा आरोप मनोज आखरे आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय. विधानसभा निवडणुकीत आम्हाला पाच ते सहा जागा देणार असल्याचं या आधी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं मात्र आम्हाला आता एकही जागा दिली जात नसल्याने आम्ही हा निर्णय घेतला असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेड स्वतंत्रपणे 50 जागा लढणार असल्याची घोषणा मनोज आखरे यांनी पुण्यातून केली आहे.
PGB/ML/PGB
22 Oct 2024