समाजसेवक आकाश सोनवणे यांनी साजरा केला अंध मुलांसोबत मुलीचा वाढदिवस

मुंबई, दि १९
वरळी येथील एन एस डी अंध वसतिगृह येथे समाजसेवक आकाश सोनवणे यांनी आपली मुलगी ईश्वरी सोनावणे हिचा 10 वा वाढदिवस अंध विद्यार्थां सोबत साजरा केला.यावेळी अंध मुलांनी ईश्वरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी वाढदिवसानिमित्त या अंध मुलांना शिक्षण उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. तळागाळातील जनतेपर्यंत समाजकार्य पोहोचवणे हे मी माझ्या परम कर्तव्य समजतो. त्याचाच एक भाग म्हणून मी माझ्या मुलीचा वाढदिवस घरी व अन्य हॉटेलमध्ये साजरा न करता या अंध मुलांसोबत साजरा केला. या अंध मुलांना पाहून तिलादेखील एक प्रेरणा मिळाली ही प्रेरणा माझ्यासाठी फार महत्त्वाची असल्याची माहिती समाजसेवक आकाश सोनवणे यांनी या समारंभात दिली. या समारंभामध्ये ईश्वरी या मुलीचे अनेक मित्रमंडळी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.KK/ML/MS