श्री क्षेत्र आळंदीत रंगला समाधी संजीवन सोहळा

 श्री क्षेत्र आळंदीत रंगला समाधी संजीवन सोहळा

पुणे, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संत ज्ञानेश्वर यांचा 727 वा समाधी संजीवन सोहळा आळंदी येथे ज्ञानोबा माऊलीच्या गजरात पार पडला. आज माऊलींचा मुख्य समाधीदिन सोहळा असून मध्यरात्री प्रमुख विश्वस्तांच्या हस्ते पवमान अभिषेक करण्यात आला.

त्यानंतर सकाळी 10 ते 12 या कालावधीत वीणा मंडपात संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज यांचं माऊलींच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन पार पडले. दुपारी 12 वाजता घंटानाद, पुष्पवृष्टी आणि आरती झाल्यानंतर माऊलींचा समाधी दिनाचा समारोप करण्यात आला.

या समाधी संजीवन सोहळ्याला राज्यभरातून लाखो वारकरी आज आळंदीमध्ये दाखल झाले होते. या सोहळ्याकरता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी सुद्धा वारकऱ्यांच्या सेवेस उपलब्ध होते.

पाच डिसेंबर पासून ते 12 डिसेंबर दरम्यान समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त संत ज्ञानेश्वर आळंदी ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन आहे करण्यात आले होते.

ML/KA/SL

11 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *