हुतात्मा राजगुरू यांना अभिवादन

पुणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरि राजगुरु यांच्या 93 व्या बलिदान दिनानिमित्त पुण्याच्या राजगुरूनगर येथील क्रांतीकारक हुतात्मा शिवराम हरि राजगुरु यांच्या जन्मस्थळी वाड्यामध्ये आणि स्मृतीस्थळावर तहसीलदारांच्या हस्ते ध्वजारोहण करुन सलामी देण्यात आली.
यावेळी राजगुरूनगर येथील क्रांतिकारक राजगुरू यांच्या जन्मस्थळावर दरवर्षी नुसार राजगुरू स्मारक समितीने ही अभिवादन केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा उपस्थिती लावली आणि स्मारक स्थळी अभिवादन केले.
ML/ML/SL
23 March 2024