शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन
सातारा, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लेफ्टनंट जनरल श्रींजय प्रताप सिंग यांच्या हस्ते सातारा येथे शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा असून अनेक युद्धामध्ये सातारा जिल्ह्यातील सैनिकांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. काश्मीर येथील कुपवाड जिल्ह्यामध्ये दहशतवादी मुकाबला करताना 17 रोजी कर्नल संतोष महाडिक हे शहीद झाले.
सातारा जिल्ह्याची शान असलेल्या शहीद संतोष महाडिक यांच्या स्मरणार्थ सातारा नगरपालिकेच्या वतीने शहीद कर्नल संतोष महाडिक यांचे भव्य शौर्य स्मारक उभारण्यात आलेले आहे. सातारा जिल्ह्यातील युवा पिढीने भविष्यातही कर्नल संतोष महाडिक यांच्या कार्याची आठवण ठेवत देशासाठी मोलाची कामगिरी करावी आणि सैन्य भरतीसाठी ही तत्पर राहावी यासाठी हे स्मारक उभारण्यात आलेले आहे.
कर्नल संतोष महाडिक यांच्या 1994 सालच्या बॅचच्या मित्र समूहांनी खास करून त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आज सातारा येथे विशेष अभिवादन केले. यावेळी लेफ्टनंट जनरल श्रींजय प्रताप सिंग आणि सातारा जिल्ह्यातील आजी, माजी सर्व कर्नल, कॅप्टन ,सेना दलातील प्रमुख अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहीद कर्नल संतोष महाडिक यांची आठवण ठेवून सातारा जिल्ह्यातील सैनिकांनी आणि सातारा नगरपालिकेने केलेल्या उभारलेल्या स्मारकाबद्दल त्यांच्या स्मारकांनी त्यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. सातारा जिल्ह्यातील तरुणांनी मोठ्या प्रमाणामध्ये जे सेवा करावी आणि सैन्यामध्ये भरती व्हावे अशी अपेक्षा यावेळी करण्यात आली.
ML/ SL/ ML
28 Dec. 2024