सलमान खानला पाकिस्तानने टाकले दहशतवाद्यांच्या यादीत

 सलमान खानला पाकिस्तानने टाकले दहशतवाद्यांच्या यादीत

इस्लामाबाद, दि. २७ : पाकिस्तान सरकारने बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे नाव थेट दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केले आहे. त्याने रियाधमध्ये झालेल्या एका आंतरराष्ट्रीय मंचावर केलेले बलुचिस्तानविषयीचे विधान केले त्यानंतर पाकने ही कारवाई केली आहे. गेल्या आठवड्यात सलमान खानने रियाध येथे आयोजित ‘जॉय फोरम’मध्ये सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात त्याने पाकिस्तान आणि बलुचिस्तान यांचा स्वतंत्र उल्लेख करत एक वक्तव्य केले होते, जे पाकिस्तान सरकारला खटकले. या विधानामुळे पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यानंतर पाकिस्तान सरकारने दहशतवादविरोधी कायदा 1997 अंतर्गत असलेल्या चौथ्या अनुसूचीमध्ये सलमान खानचे नाव समाविष्ट केले.

ही चौथी अनुसूची म्हणजे अशा व्यक्तींची यादी जी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्या किंवा राष्ट्रविरोधी वक्तव्ये करणाऱ्या व्यक्तींना समाविष्ट करण्यासाठी वापरली जाते. सलमान खानच्या विधानामुळे पाकिस्तानने त्याला अशा यादीत टाकणे हे एक राजकीय आणि कडवे पाऊल मानले जात आहे.

या घटनेनंतर भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी पाकिस्तानच्या या निर्णयावर टीका केली असून, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानमधील काही गटांनी या निर्णयाचे समर्थन करत सलमान खानवर कारवाईची मागणी केली आहे.

सलमान खान किंवा त्याच्या टीमकडून यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. येत्या काळात भारत सरकार यावर काय भूमिका घेते आणि सलमान खान यावर काय प्रतिक्रिया देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *