देशात प्रोटीन उत्पादनांच्या विक्रीमध्ये चौपट वाढ

 देशात प्रोटीन उत्पादनांच्या विक्रीमध्ये चौपट वाढ

मुंबई, दि. ३ : भारतात प्रोटीन उत्पादनांची विक्री वेगाने वाढत आहे. ॲमेझॉन इंडियाच्या आकडेवारीनुसार, प्रोटीन आणि न्यूट्रिशन पोर्टफोलिओमध्ये 35% वाढ झाली, तर सामान्य एफएमसीजी क्षेत्राची वाढ केवळ 9% आहे. आयएमएआरसीचा अंदाज आहे की, 2024 मध्ये भारताचे प्रोटीन सप्लिमेंट बाजार 7,461 कोटी रुपयांचे होते, जे 2033 पर्यंत 13,186 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

प्रोटीन सप्लिमेंट्सच्या प्रीमियम उत्पादनांची (सुमारे 4,500 पेक्षा जास्त किमतीची) विक्री सामान्य उत्पादनांपेक्षा 3.5 पट वेगाने वाढत आहे. ही वाढ केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाही, जिथे बंगळूरूसारखी शहरे 50-59% दराने वाढत आहेत. कोल्हापूर, मंगळूरू, देहरादून आणि अंबालासारख्या टियर-2,3 शहरांमध्येही 40% वाढ दिसून येत आहे.

रेडसीर स्ट्रॅटेजी कन्सल्टंट्सचे मृगांक गुटगुटिया म्हणतात की, भारतात आता लोक आरोग्यासाठी प्रीमियम देण्यास तयार आहेत. अंड्याचेच उदाहरण घ्या, 2011 मध्ये वापर 2,500 टन होता, जो 2024 मध्ये 5 हजार टनांपर्यंत पोहोचला. अंड्याचे बाजार दरवर्षी 7% वाढत आहे आणि ते 70 हजार कोटी रुपयांचे झाले आहे.

75% प्रोटीन उत्पादनांमध्ये शिसे, 27.8% मध्ये कॅडमियम आणि 94.4% मध्ये तांबे आढळले. 69.4% म्हणजेच 25 उत्पादनांवर जेवढे प्रोटीन लिहिले होते, प्रत्यक्षात त्यापेक्षा 10 ते 50% कमी प्रोटीन होते. हा निष्कर्ष जर्नल मेडिसिनमध्ये 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या केरळमधील राजगिरी हॉस्पिटलचे डॉ. सिरिएक एब्बी फिलिप्स यांच्या संशोधनातून काढण्यात आला आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *