काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगकडून १० कोटींची खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी!

 काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगकडून १० कोटींची खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी!

मुंबई, दि २४: अकोला पश्चिमचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून १० कोटी रुपयांच्या खंडणीचा आंतरराष्ट्रीय कॉल आल्याची धक्कादायक माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदारांना तात्काळ कडक सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी वडेट्टीवार यांनी सभागृहात केली.

विजय वडेट्टीवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना सांगितले की
१७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता आमदार साजिद खान पठाण यांना एक आंतरराष्ट्रीय कॉल आला. बिश्नोई गँगशी सबंधित शुभम लोणकर याने फोन करून आमदारांकडे १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आणि पैसे न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली,ही माहिती वडेट्टीवार यांनी सभागृहाला दिली. धमकी देणाऱ्याने अत्यंत उद्दामपणे म्हटले की, पोलिसांना सांगितले तर ते महिना-दोन महिने संरक्षण देतील, पण सहा महिन्यांनी किंवा वर्षाने आम्ही तुला सोडणार नाही,मारल्याशिवाय राहणार नाही. या भाषेत काँग्रेसचे आमदार पठाण यांना धमकी दिल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेबाबत
वडेट्टीवार म्हणाले, राज्यात लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील, तर सामान्य जनतेचे काय? ज्या गँगने यापूर्वी गोळीबाराच्या घटना घडवून आणल्या आहेत, त्यांच्याकडून धमकी येणे ही अतिशय गंभीर बाब आहे. धमकीचा ऑडिओ ऐकला तर अंगावर काटा येतो. साजिद पठाण यांचा कोणत्याही गुन्हेगारी क्षेत्राशी संबंध नाही, तरीही त्यांना लक्ष्य केले जात आहे.काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडलेल्या या मुद्द्याची गांभीर्याने दखल घेत विधानसभा अध्यक्षांनी सरकारला निर्देश दिले की, हा विषय अत्यंत गंभीर आहे. शासनाने तात्काळ या प्रकरणाकडे लक्ष देऊन संबंधित आमदारांच्या सुरक्षेबाबत योग्य ती पावले उचलावीत.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *