शिवसेना गणेशोत्सव सजावट स्पर्धेच्या पारितोषिक समारंभाला उस्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि ७
शिवसेना आयोजित “उत्सव मुंबईचा – सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धा” आणि “महामंगळागौर” स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरणाचा सोहळा नुकताच गिरगाव येथील भारतीय विद्या भवन येथे पार पडला. या कार्यक्रमाला मुंबईतील सर्व गणेशोत्सव सार्वजनिक मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमांमध्ये राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांच्या हस्ते विजेत्या मंडळांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमात विविध देखावे, अभिनव सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी शिवसेना नेत्या सुशिबेन शाह यांच्या हस्तेही अनेक मंडळांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
मलबार हिल येथील ताडदेव पोलिस वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला द्वितीय पारितोषिक आणि रोख रक्कम रु. १ लाख आणि भायखळा येथील देशमुख मंडळाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाल्याबद्दल मिळाल्याबद्दल त्यांचे विविध मान्यवरांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
याकार्यक्रमास शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी , आमदार अशोक पाटील, उपनेत्या शीतल म्हात्रे , सुवर्णा करंजे, तृष्णा विश्वासराव, कलाताई शिंदे, संजना घाडी, यांसह अनेक मान्यवर व सहकारी उपस्थित होते.KK/ML/MS