साईप्रसाद खेडकर ने सगळ्या विषयात घेतले 35 गुण…!!

जालना, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील एका दहावीच्या विद्यार्थ्यानं सर्व विषयात 35 टक्के गुण मिळवलेत. साईप्रसाद रविंद्र खेडकर असं या गुणवंत विद्यार्थ्यांच नाव असून त्याला 35 टक्के गुण प्राप्त होऊन तो दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालाय.
साईप्रसाद ने संपादित केलेल्या यशाबद्दल त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतोय. साईप्रसाद पास झाल्याने त्याच्या पास मित्रानी केक कापून त्याचे अभिनंदन केलंय. साईप्रसाद रविंद्र खेडकर हा वडीगोद्री येथील श्री गुरुदेव विद्या मंदिर शाळेचा विद्यार्थी आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर साईप्रसाद रविंद्र खेडकरला त्याच्या आजीने मोबाईल भेट देऊन पेढे भरवून त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केलाय. साईप्रसाद ने सर्व विषयात 35-35 मार्क मिळवत 35 टक्के गुण मिळवत घवघवीत(!) यश मिळवले आहे. त्यामुळं त्याच्यासह कुटुंब आणि मित्रांचं आनंद गगनात मावेनासा झालाय. घरातल्या मंडळींनी त्याचं औक्षण करत अभिनंदन केलंय.
ML/ML/SL
28 May 2024