सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सैनिकांना रक्षाबंधन निमित्ताने राख्या

नागपूर दि १९– राखी, बहीण भावाच प्रेमाचं नात असलेला हा सण, बहीण भावाच्या पवित्र नात्याची आठवण सांगणारा सण म्हणजे रक्षाबंधन. सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने देशाचे रक्षण करणाऱ्या सीमेवरील सैनिकांसाठी प्रहार समाज जागृती संस्थेच्या वतीने सीमेवरील सैनिकांसाठी तीन लाख राख्या पाठविण्यात येणार आहेत. नागपुरातील बनियन हॉल, चिटणवीस सेंटर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.

प्रहार समाज जागृती संस्था आणि विदर्भातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना रक्षाबंधन निमित्ताने 3 लाख राख्या पाठविण्यात येणार आहेत. प्रहार समाज जागृती संस्था आणि विदर्भातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या विंग कमांडर APS कामठीच्या कर्नल लवलीना यांना सुपूर्द करण्यात आल्या. यावेळेला कर्नल लवलीना आणि उपस्थित असलेल्या जवानांना संस्थेच्या वतीने राखी देखील बांधण्यात आली. मोठ्या प्रमाणात यावेळेला विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते. ML/ML/MS